अ‍ॅपशहर

बेंगळुरू मेट्रोचे 'शटर डाऊन', प्रवाशांचे हाल

बेंगळुरू मेट्रोने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे शुक्रवारी हाल झाले. मेट्रो कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ ही सेवा बंद करून कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

Maharashtra Times 7 Jul 2017, 10:54 am
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम staff protest hits metro operations across bengaluru
बेंगळुरू मेट्रोचे 'शटर डाऊन', प्रवाशांचे हाल


बेंगळुरू मेट्रोने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे शुक्रवारी हाल झाले. मेट्रो कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ ही सेवा बंद करून कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. त्यामुळे मेट्रोने विविध मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार्यालय वा इच्छित स्थळी पोहोचता आले नाही.

बेंगळूरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. कंपनीचे प्रमुख पब्लिक रिलेशन्स ऑफिसर यु. ए. वसंत राव म्हणाले, 'मेट्रो कर्मचारी आणि कर्नाटक स्टेट इंडस्ट्रीअल सिक्युरिटी पर्सोनेल यांच्यात गुरुवारी बाचाबाची झाली. यानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांपैकी काहींना अटक झाली. परिणामी कर्मचारी आपल्या या सहकाऱ्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आम्ही यातून तोडगा काढण्चाचा प्रयत्न करत आहोत.'

बायपनहळ्ळी, नागसारडा, मयूर रोड आणि येलचेनहळ्ळी या मार्गावरून सकाळी ठीक ५ वाजता गाड्या सुरू होतात. पण आज मात्र कर्मचाऱ्यांनी मेट्रो रेल्वे स्थानकावरचे शटरच बंद केले आहे. नम्मा मेट्रोचे जाळे शहरात सुमारे ४२ किमी पसरलेले आहे. या मेट्रोवर सुमारे ३ लाख प्रवासी अवलंबून आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज