अ‍ॅपशहर

द्रमुकची धुरा एम. के. स्टॅलिन यांच्याकडं

राजकीय वारशावरून एम. करुणानिधी यांच्या दोन मुलांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वादात अखेर करुणानिधी यांचा लहान मुलगा स्टॅलिन यांची सरशी झाली आहे. स्टॅलिन यांची द्रमुकच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुकमध्ये झालेल्या पक्षांतर्गत सत्तातरानंतर द्रमुकनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं तामिळनाडूच्या राजकारणात नवं पर्व सुरू होणार आहे.

Maharashtra Times 4 Jan 2017, 11:30 am
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stalin appointed dmk working president
द्रमुकची धुरा एम. के. स्टॅलिन यांच्याकडं

राजकीय वारशावरून एम. करुणानिधी यांच्या दोन मुलांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वादात अखेर करुणानिधी यांचा लहान मुलगा स्टॅलिन यांची सरशी झाली आहे. स्टॅलिन यांची द्रमुकच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुकमध्ये झालेल्या पक्षांतर्गत सत्तातरानंतर द्रमुकनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं तामिळनाडूच्या राजकारणात नवं पर्व सुरू होणार आहे.

चेन्नई येथील द्रमुकच्या मुख्यालयात सुमारे ३ हजार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्टॅलिन यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, करुणानिधी हे या बैठकीला उपस्थित नव्हते. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानं ते बैठकीला आले नाहीत.

द्रमुकचे सर्वेसर्वा असलेले करुणानिधी सध्या ९२ वर्षांचे असून प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्रस्त आहेत. करुणानिधी यांच्यानंतर द्रमुकची धुरा वाहण्यासाठी अलागिरी व स्टॅलिन यांच्यात चुरस होती. अलागिरी यांचा पक्ष नेतृत्वावरील दावा करुणानिधी यांनी यापूर्वीच फेटाळून लावला होता. मात्र, त्याबाबत अधिकृत निर्णय झाला नव्हता. स्टॅलिन यांच्या नियुक्तीमुळं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज