अ‍ॅपशहर

मथुरेत बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू तर ५० हून अधिक बेशुद्ध

Mathura News: उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनात दोघांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक भाविक जखमी झाल्याचे कळते.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2022, 8:10 am
मथुरा: संपूर्ण भारतात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातून एक वाइट बातमी समोर आली आहे. वृंदावन येथील प्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात रात्री उशिरा चेंगराचेंगरी झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Banke Bihari


बांके बिहारी मंदिरात भाविक मंगला आरतीसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गर्दी इतकी जास्त होती की ५० हून अधिक भाविक बेशुद्ध झाले आणि खाली कोसळले. पोलिस अधिक्षक अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दी जास्त झाल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये नोएडा येथील निर्मला देवी आणि जबलपूर येथील वृंदावन वासी राजकुमार यांचा समावेश आहे.

वाचा- राज्यासमोर पुन्हा नवं संकट; स्वाइन फ्लूने नाशिक जिल्ह्यात तब्बल ११ जणांचा बळी घेतल्याने धोका वाढला


मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी VIP लोकांना दर्शनासाठी विशेष सुविधा दिली आहे. एका भाविकाने सांगितले की, वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वत:च्या आईला घेऊन आले होते. तर मथुरा रिफायनरीचे एक मोठे पोलिस अधिकारी त्याच्या सात नातेवाईकांसोबत आरतीसाठी पोहोचले होते. हे सर्वजण बाल्कनीतून दर्शन घेत होते आणि त्यांच्या सुरक्षेसाठी छतावर जाणारे गेट बंद करण्यात आले होते.

वाचा- दहीहंडी उत्सवात शोककळा; उत्साहात नाचतानाच हृदयविकाराच्या झटक्याने गोविंदाचा मृत्यू

रात्री दोन वाजता मंदिरात आरती सुरू होणार होती. त्याआधी इतकी गर्दी झाली की त्यामुळे काही भाविक बेशुद्ध झाले. हा सर्व गोंधळ सुरू असताना पोलिस प्रशासनाने अधिक कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचा दावा करण्यात येत आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख