अ‍ॅपशहर

बिस्मिल्लाह खान यांची शहनाई नातवानंच चोरली

'भारतरत्न' उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या घरातून चोरीला गेलेल्या चांदीच्या शहनाईंचा (सनई) उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. उत्तर प्रदेश एसटीएफच्या वाराणसी युनिटने या चोरीप्रकरणी दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नातवासह अन्य दोन सोनाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ पैकी ४ शहनाई सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Times 10 Jan 2017, 6:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त । वाराणसी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stf recovers 4 stolen shehnai of ustaad bismillah khan
बिस्मिल्लाह खान यांची शहनाई नातवानंच चोरली

'भारतरत्न' उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या घरातून चोरीला गेलेल्या चांदीच्या शहनाईंचा (सनई) उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. उत्तर प्रदेश एसटीएफच्या वाराणसी युनिटने या चोरीप्रकरणी दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नातवासह अन्य दोन सोनाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ पैकी ४ शहनाई सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.

एसटीएफने जप्त केलेल्या शहनाईंमध्ये एका चांदीच्या शहनाईचा समावेश आहे. दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे नातू नजरे हसन शादाब याच्यासह सोने-चांदीचे व्यापारी असलेल्या बाप-लेकाला अटक केली आहे. शंकर लाल शेट आणि सुजीत शेठ असे आरोपीचे नाव आहे.

उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या घरातून पाच शहनाई (सनई) चोरीला गेल्या होत्या. या शहनाई उस्ताद यांच्या मूळ गावातील घरातून चोरीला गेल्या होत्या. ५ डिसेंबर रोजी उस्ताद बिस्मिल्ला यांचा मुलगा काझीम यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोरीची रितसर तक्रार केली होती. या चोरीप्रकरणात भाऊ नाझिमचा हात असल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती. दोन्ही भावात संपत्तीवरुन वाद सुरू आहे. चांदीच्या शहनाईमध्ये एक शहनाई माजी पंतप्रधान नरसिंह राव तर दुसरी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, तिसरी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी भेट म्हणून उस्ताद बिस्मिल्ला खान यांना दिली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज