अ‍ॅपशहर

'उरी'चा निषेध करण्यास पाक कलाकारांचा नकार

उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करा, एवढंच आम्ही पाकिस्तानी कलाकारांना म्हटलं होतं. पाकिस्तानचा उल्लेखही आम्हाला अपेक्षित नव्हता. पण तरीही या कलाकारांनी स्पष्ट नकार दिला. अशावेळी आम्ही काय करायला हवं होतं?, असा प्रश्न झी टीव्हीचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा यांनी केलं आहे.

Maharashtra Times 29 Sep 2016, 11:25 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम subhash chandra urged pakistani actors to condemn terrorism but nobody did it
'उरी'चा निषेध करण्यास पाक कलाकारांचा नकार


उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करा, एवढंच आम्ही पाकिस्तानी कलाकारांना म्हटलं होतं. पाकिस्तानचा उल्लेखही आम्हाला अपेक्षित नव्हता. पण तरीही या कलाकारांनी स्पष्ट नकार दिला. अशावेळी आम्ही काय करायला हवं होतं?, असा प्रश्न करत झी टीव्हीचे सर्वेसर्वा खासदार सुभाष चंद्रा यांनी पाकच्या कलाकारांना होणारा विरोध योग्यच असल्याची भूमिका मांडली आहे.

झी टीव्हीच्या 'जिंदगी' वाहिनीवरील पाकिस्तानी मालिका बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. पण प्रेम एकतर्फी असून उपयोग नाही, अशी चपराक सुभाष चंद्रा यांनी पाक कलाकारांना लगावली. मालिका बंद करणं हा दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्याचा एक मार्ग असल्याचंही त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे, 'जिंदगी'वरील ३०० तासांच्या कार्यक्रमांसाठी सुमारे ६० कोटी रुपये वाहिनीनं या मालिकांच्या निर्मात्यांना आधीच दिले आहेत. परंतु, देशप्रेम, देशाभिमान आणि जनतेच्या भावनांपुढे पैसा महत्त्वाचा नसल्याचं सुभाष चंद्रा यांनी ठामपणे सांगितलं. त्यांची ही भूमिका नक्कीच गौरवास्पद आहे.

मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना धमकी दिल्यानंतर, 'जिंदगी' वाहिनीवरील पाकिस्तानी मालिका बंद करण्याचा निर्णय घेऊन 'झी'नं या कलाकारांना मोठा झटका दिला होता. आपल्या या निर्णयाचं समर्थन करताना सुभाष चंद्रा म्हणाले, 'तुम्हाला लढायचं असेल तर समोर येऊन लढा. झोपलेल्या जवानांवर हल्ला का करता? पठाणकोट झालं, आता उरी झालं; हे थांबायलाच तयार नाहीत. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणूनच आम्ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला.'

फवाद खान, माहिरा खान, अली जफर, राहत फतेह अली खान, आतिफ असलम, वीणा मलिक आणि अन्य पाकिस्तानी कलाकारांना उरी हल्ल्याचा निषेध करण्याचं आवाहन केलं होतं. त्यात पाकिस्तानचं नावही घ्यायचं नव्हतं. पण, ते नाही म्हणाले. मग आम्हीही तितकंच कठोर व्हायचं ठरवलं, असं चंद्रा यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज