अ‍ॅपशहर

रघुराम राजनना पुन्हा शिकागोला पाठवा!- स्वामी

धाडसी निर्णय आणि करारी बाण्यासाठी ओळखले जाणारे रघुराम राजन यांना पदावरून हटवण्याची मागणी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केली आहे. राजन यांची धोरणं, अर्थनीती भारतासाठी अनुकूल नसल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.

Maharashtra Times 12 May 2016, 2:25 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम subramanian swamy says kick out raghuram rajan before his term ends
रघुराम राजनना पुन्हा शिकागोला पाठवा!- स्वामी


धाडसी निर्णय आणि करारी बाण्यासाठी ओळखले जाणारे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून हटवण्याची मागणी करून आज राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. राजन यांची धोरणं, अर्थनीती भारतासाठी अनुकूल नाही, त्यांना पुन्हा शिकागोला प्राध्यापकी करायला पाठवायला हवं, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

चलन फुगवटा कमी करण्यासाठी व्याजदर वाढवण्याच्या रघुराम राजन यांच्या निर्णयामुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याचं मत स्वामींनी मांडलं. व्याजदर वाढवल्यानं बेकारी वाढली, महागाई वाढली आणि देशाचा जीडीपी दर घटल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. देशाला राजन यांच्या धोरणांची गरज नाही, त्यांना पुन्हा शिकागो विद्यापीठात पाठवून द्यावं, असा टोलाही स्वामींनी हाणला.

अर्थात, रघुराम राजन यांना पदावरून हटवण्याची मागणी याआधीही झाली आहे. त्यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपतोय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज