अ‍ॅपशहर

‘पाकिस्तानचे चार तुकडे करावेत’

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानचे चार तुकडे करावेत, असे विधान भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बुधवारी केले.

Maharashtra Times 28 Dec 2017, 5:05 am
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानचे चार तुकडे करावेत, असे विधान भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बुधवारी केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम subramanian swamy wants india to tear pakistan into four pieces
‘पाकिस्तानचे चार तुकडे करावेत’


पाकिस्तानने २५ डिसेंबरला कुलभूषण जाधव आणि त्यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांची भेट घडवून आणली. मात्र, ती एका कंटेनरमध्ये घडवली. तसेच, कुटुंबीय आणि जाधव यांच्यामध्ये काचेची भिंत होती. त्यांना मराठीतून मनाई करण्यात आली होती. तसेच, भेटीपूर्वी दोघींचीही टिकल्या, बांगड्या, मंगळसूत्र काढून ठेवण्यास भाग पाडले. तसेच, चेतनकुल यांचे बूटही संशयावरून काढून घेण्यात आले. या प्रकारानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर स्वामी बोलत होते. ‘पाकिस्तानचे चार तुकडे करणे हेच त्यांच्यासारख्या शत्रू आणि खुनशी देशाबरोबर वागण्याची योग्य रीत आहे,’ असे स्वामी म्हणाले. जाधव कुटुंबीयांच्या अवमानाची तुलना स्वामी यांनी महाभारतातील द्रौपदीशी केली. ‘पाकिस्तानने जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेली वागणूक महाभारतातील द्रौपदीच्या वस्त्रहरणासारखी होती,’ अशी टीका स्वामी यांनी केली. ‘पाकिस्तानी नागरिकांना मनावतावादी भूमिकेतून वैद्यकीय व्हिसा देणे भारताने तातडीने थांबवावे,’ अशी मागणीही स्वामी यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज