नवी दिल्ली: अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रति सिलिंडर २ रुपये ९४ पैशांची वाढ बुधवारी जाहीर करण्यात आली. गॅसच्या आधारभूत किंमतीत बदल झाल्याने करपरिणाम म्हणून ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत गॅल सिलिंडरची किंमत बुधवार मध्यरात्रीपासून ५०५.३४ रुपये होणार आहे. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग सातवी वाढ आहे.
Gas Cylinder: अनुदानित गॅस महागला!
अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रति सिलिंडर २ रुपये ९४ पैशांची वाढ बुधवारी जाहीर करण्यात आली. गॅसच्या आधारभूत किंमतीत बदल झाल्याने करपरिणाम म्हणून ही वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स 1 Nov 2018, 11:14 am