अ‍ॅपशहर

सुकमात २ आठवडे जवानांना 'ती' ड्युटी नाही...

सुकमातल्या नक्षलवाद्यांच्या ताज्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन आठवड्यांसाठी रस्तेनिर्मितीच्या कामातून सैनिकांना वगळण्यात आलं आहे. मागील आठवड्यात नक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर या भागातले रस्तेनिर्मितीचे काम थांबवण्यात आले आहे.

Maharashtra Times 30 Apr 2017, 9:13 am
मटा ऑनलाइन वृत्त । सुकमा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sukma attack road opening duties suspended in maoist affected areas
सुकमात २ आठवडे जवानांना 'ती' ड्युटी नाही...


सुकमातल्या नक्षलवाद्यांच्या ताज्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन आठवड्यांसाठी रस्तेनिर्मितीच्या कामातून सैनिकांना वगळण्यात आले आहे. मागील आठवड्यात नक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर या भागातले रस्तेनिर्मितीचे काम तूर्त थांबवण्यात आले आहे.

नक्षल ऑपरेशन्सचे विशेष पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी सांगितले, 'रस्ता बनवण्याचे काम पुढील दोन आठवड्यांसाठी जवानांना दिले जाणार नाही. सध्या आम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या कारवाईवरच लक्ष केंद्रीत करणार आहोत आणि सगळे जवान याच कामात समाविष्ट केले जाणार आहेत.'

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण बस्तर जिल्ह्यात दररोज सुमारे ५ ते ७ हजार सैनिक रस्ता बनवण्याच्या कामासाठी तैनात केले जातात. बस्तरमध्ये सध्या असे ३० हजार जवान तैनात आहेत. नक्षलवाद्यांचा हल्ला झाला तेव्हा सीआरपीएफची ७४ वी बटालियन एका तयार होत असलेल्या रस्ता आणि पुलाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात होते. या हल्ल्याच्या वेळी ९० जवान ड्युटीवर होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज