अ‍ॅपशहर

CBSE: दिल्लीची सुकृती देशात पहिली

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून दिल्लीतील सुकृती गुप्ता हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. सुकृतीला ५०० पैकी ४९७ गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा अशा तिन्ही क्रमांकांवर नाव कोरत मुलींनी मुलांना मागे टाकले आहे.

Maharashtra Times 21 May 2016, 2:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sukriti gupta tops cbse class 12 exams
CBSE: दिल्लीची सुकृती देशात पहिली

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून दिल्लीतील सुकृती गुप्ता हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. सुकृतीला ५०० पैकी ४९७ गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा अशा तिन्ही क्रमांकांवर नाव कोरत मुलींनी मुलांना मागे टाकले आहे.

सीबीएसई बारावीत पहिली आलेली सुकृती ही दिल्लीतील अशोक विहार येथील मॉन्टफर्ट स्कूलची विद्यार्थिनी आहे. कुरुक्षेत्र (हरयाणा) येथील टागोर पब्लिक स्कूलच्या पलक गोयल (४९६ गुण) हिने दुसरा, करनाल (हरयाणा) येथील सौम्या उपल (४९५ गुण) हिने तिसरा तर चेन्नई येथील अजीश शेखरने चौथा क्रमांक पटकावला आहे.

मुलींच्या यशाचा टक्का वाढला

सीबीएसई बारावीचा निकाल यंदा ८३.०५ टक्के इतका लागला. त्यात मुलींच्या निकालाचं प्रमाण ८८.५८ तर मुलांच्या निकालाचं प्रमाण ७८.८५ टक्के राहिलं. एकूण १० लाख ३७ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. केरळमधील तिरुवअनंतपुरम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९७.६१ टक्के इतका लागला. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग ९२.६३ टक्के इतक्या निकालासाह दुसऱ्या स्थानी राहिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज