अ‍ॅपशहर

हायवेवर मद्यविक्रीस बंदी : SC

हायवेवर मद्यविक्री करण्यास सर्वेाच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. सर्वच राज्यातील महामार्ग ​ आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देणे बंद करा, असा महत्वपुर्ण आदेश न्यायालयाने केंद्र आणि राज्यसरकारांना दिला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून हायवेवर पुर्णपणे मद्यविक्री बंद होणार आहे.

Maharashtra Times 15 Dec 2016, 1:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supreme court directs to ban liquor on all highwa
हायवेवर मद्यविक्रीस बंदी : SC

हायवेवर मद्यविक्री करण्यास सर्वेाच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. सर्वच राज्यातील महामार्ग ​ आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देणे बंद करा, असा महत्वपुर्ण आदेश न्यायालयाने केंद्र आणि राज्यसरकारांना दिला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून हायवेवर पुर्णपणे मद्यविक्री बंद होणार आहे.

मद्यविक्रीच्या परवान्याची मुदत संपेपर्यंत हायवेवरील दुकानांना दारू विकता येईल. मुदत संपताच त्यांना मद्यविक्री बंद करावी लागेल, असा निर्णयही न्यायालयाने दिल्याने या मद्य विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. या दुकानदारांच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर त्यांचे परवाने नुतनीकरण करू नये, असे या आदेशात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. एप्रिल महिन्यात हायवेवरील सर्व दुकानदारांचे परवान्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे एप्रिलपासून खऱ्या अर्थाने हायवेंवर मद्यविक्री पुर्णपणे बंद होणार आहे. यापुर्वी न्यायालयाने हायवेवरील मद्यविक्रीवर नाराजी व्यक्त केली होती. हायवेवरील मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचा निर्णय केंद्र आणि राज्यसरकारांनी घेतला होता. त्यावर आक्षेप घेणारी जनहित याचिका काही मद्य विक्रेत्यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने कडक ताशेरेही ओढले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज