अ‍ॅपशहर

‘अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणारच’

पुणे जिल्ह्यातील ‘सहारा ग्रुप’च्या ‘अॅम्बी व्हॅली’ प्रकल्पाच्या लिलावास स्थगिती देण्याची मागणी करणारी ‘सहारा’चे प्रमुख सुब्रतो रॉय यांची याचिका सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळून लावली.

Maharashtra Times 11 Aug 2017, 3:36 am
नवी दिल्लीः पुणे जिल्ह्यातील ‘सहारा ग्रुप’च्या ‘अॅम्बी व्हॅली’ प्रकल्पाच्या लिलावास स्थगिती देण्याची मागणी करणारी ‘सहारा’चे प्रमुख सुब्रतो रॉय यांची याचिका सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळून लावली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supreme court refuses to stay auction of saharas aamby valley
‘अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणारच’


न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई आणि न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने या संदर्भातील निकाल दिला. सुब्रतो रॉय यांची मागणी आम्ही फेटाळतो आहोत, असे खंडपीठाने निकालामध्ये म्हटले आहे. रॉय यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले, ‘सप्टेंबरपर्यंत लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी. तोपर्यंत रॉय यांना एक हजार पाचशे कोटी रुपयांची जमवाजमव करण्याची संधी मिळेल आणि ते पैसे सेबी-सहारा अशा संयुक्त खात्यामध्ये जमा करण्यात येतील.’

मात्र, खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली आणि योग्य वेळ येताच आम्ही लिलाव प्रक्रियेचा आदेश देऊ, असे सांगितले. ३४ हजार कोटी रुपये किमतीच्या ‘अॅम्बी व्हॅली’ प्रकल्पाच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत रॉय यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. रॉय यांना १५ कोटी रुपये सेबी-सहारा या संयुक्त खात्यावर जमा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने २५ जुलै रोजी दिले होते. ‘हे पैसे जमा केल्यानंतरच संपूर्ण रकमेच्या परतफेडीसाठी अठरा महिन्यांचा कालावधी देता येईल का, हे ठरविता येईल,’ असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.

सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे १४ ऑगस्ट रोजी ‘अॅम्बी व्हॅली’ प्रकल्पाच्या लिलावाची नोटीस जाहीर करण्यात येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज