अ‍ॅपशहर

तीन तलाक: सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

तीन तलाक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने काझींना तीन तलाकबाबत निर्देश देण्याचे मान्य केले.

Maharashtra Times 18 May 2017, 4:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supreme court reserves its decision on triple talaq
तीन तलाक: सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला


तीन तलाक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने काझींना तीन तलाकबाबत निर्देश देण्याचे मान्य केले. आता सर्वांचेच लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीत, सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला निकाहनाम्यात महिलांना तीन तलाकसाठी नकार देण्याच्या पर्यायाबाबत विचारणा केली होती. काझींना निकाहनाम्यात तीन तलाकात महिलांची संमती घेण्याबाबत सूचना देता येईल का याचीही सुप्रीम कोर्टाकडून पर्सनल लॉ बोर्डाला विचारणा करण्यात आली होती. आज सुनावणी दरम्यान पर्सनल लॉ बोर्डाने काझींना निर्देश देण्याबाबत सुप्रीम कोर्टात अनुकूलता दर्शवली. मात्र, सुप्रीम कोर्टाने कोणत्याही समुदायाच्या विशेष चालीरीतींबाबत हस्तक्षेप करणे योग्य नाही असेही पर्सनल लॉ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात नमूद केले. धर्मशास्त्रानुसार ज्या गोष्टी पाप आहेत त्या कोणत्याही समुदायाच्या परंपरांचा हिस्सा कसा काय असू शकतो अशी थेट विचारणा सुप्रीम कोर्टाने केली. या प्रकरणातील याचिकाकर्त्या सायरा बानो यांच्या वकिलांनी तीन तलाक हे पाप असल्याचे सुनावणी दरम्यान म्हंटले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज