अ‍ॅपशहर

supriya sule : 'आरक्षणावर महाराष्ट्रातून दिशाभूल केली जातेय', सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

मराठा, धनगर आणि ओसीबीस आरक्षणावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्रासह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे. केंद्र सरकारने राजकारणाच्या वर उठून आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन सुळे यांनी केलं आहे. लोकसभेत १२७व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेवेळी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2021, 4:49 pm
नवी दिल्लीः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ( maratha reservation ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन घटनादुरुस्तीची मागणी केली होती. ही मागणी सरकारने मान्य केल्याने सर्वांचे आभारी आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( supriya sule ) लोकसभेत चर्चेवेळी म्हणाल्या. पण आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे अडचणी येत आहेत. यामुळे ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी. ही समस्या दूर झाली तर केंद्राचा ( 127th Constitutional Amendment Bill ) आणि राज्याचाही प्रश्न सुटेल. सर्वांचं भलं होईल, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supriya sule attacks devendra fadnavis on maratha reservation issue
'आरक्षणावर महाराष्ट्रातून दिशाभूल केली जातेय', सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा


आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असं आश्वासन फडणवीस सरकारने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलं होतं. पाच वर्षे त्यांचे सरकार चालले. ५ वर्षांत कॅबिनेटच्या अनेक बैठका झाल्या. अद्याप धनगरांना आरक्षण मिळालेलं नाही. पण आदिवासींचं आणि ओबीसींच आरक्षण काढून मराठा सामाजाला द्यावं, असं आम्हाला अजिबात नकोय. प्रत्येकाला हक्क देणं ही मायबाप सरकारची जबाबदारी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

maratha reservation : 'आरक्षणासाठी समाजा-समाजाने रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडायची का?'

ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा महाराष्ट्र सरकारला उपलब्द करून द्यावा. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींना दिलेल्या पत्रात इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावं. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. पण मराठा असो, पाटीदार असो किंवा जाट आणि गुर्जर असो सर्वांनी आरक्षणाची मागणी केली आहे. पण महाराष्ट्रात मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत आंदोलनं केली. पण ही आंदोलन शांततेत पार पडली.

maratha reservation : 'आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून मराठा समाजाला आरक्षण द्या', काँग्रेसची लोकसभेत मागणी

राजकारणापासून वर उठून महाराष्ट्र सरकारला मराठा आणि धनगर आरक्षणासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावं, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातून दिशाभूल करणारी ( devendra fadnavis ) माहिती दिली जात आहे. या ऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकलं तर योग्य ठरेल. तसंच शोषित, पिडीत वंचितांना यांच्यासाठी सरकारने महागाई कमी करावी. नोकऱ्या उपलब्ध करून द्यावात, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

महत्वाचे लेख