अ‍ॅपशहर

राहुल गांधींच्या आरोपानंतरही जनता मोदींसोबतच

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना जनता फार गंभीरपणे घेत नसल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राहुल यांनी मोदींवर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं मत ८३ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे.

Maharashtra Times 22 Dec 2016, 11:56 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम survey 83 percent people thinks rahuls allegations on modi are baseless
राहुल गांधींच्या आरोपानंतरही जनता मोदींसोबतच


काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना जनता फार गंभीरपणे घेत नसल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राहुल यांनी मोदींवर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं मत ८३ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे.

'एनबीटी व सी-व्होटर'नं केलेल्या एका पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. मोदींच्या विरोधात माझ्याकडं भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, असं राहुल गांधी यांनी संसद भवनात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर १९ व २० डिसेंबरच्या दरम्यान २४ राज्यांतील ४१९ लोकसभा मतदारसंघ व ८९७ विधानसभा मतदारसंघात ही पाहणी करण्यात आली.

शहरी, निमशहरी, ग्रामीण भागातील कनिष्ठ, मध्यम व उच्च मध्यम अशा सर्व वर्गातील लोकांना या पाहणीअंतर्गत मोदींवरील आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यातील ५७.७ टक्के लोकांनी राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन असून आमचा त्यांच्यावर अजिबात विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. ७.६ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, राहुलवर त्यांचा विश्वास आहे. मात्र, मोदींवरील आरोप त्यांना खरे वाटत नाहीत. मोदींवरील आरोपांत तथ्य असल्याचं ९.८ टक्के लोकांचं म्हणणं आहे. तर, राहुल गांधी यांच्यावर विश्वास नसला तरी मोदींवरील आरोप खरे असल्याचं ३.९ टक्के लोकांचं म्हणणं आहे.

नोटाबंदीला पाठिंबा

नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनतुटवड्यामुळं देशातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. नोटाबंदीला ४० दिवस उलटल्यानंतरही हा त्रास कमी झालेला नाही. असं असतानाही बहुतेक लोक मोदींच्या पाठिशी असल्याचं पाहणीत दिसून आलं आहे. अर्थात, ही परिस्थिती लवकरात लवकर बदलावी, असं मतही लोकांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज