अ‍ॅपशहर

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी CBIची एसआयटी, ४ अधिकाऱ्यांचा समावेश

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले. यानंतर सीबीआयने चौकशीसाठी एक टीम तयार केली आहे. या टीमकडून रिया चक्रवर्तीचीही चौकशी केली जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2020, 10:44 pm
नवी दिल्लीः अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय करणार आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने एक एसआयटी टीम तयार केली आहे. यात चार वरिष्ठ अधिका्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार सीबीआयचा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी यासंदर्भात निर्णय देताना म्हटलं आहे. बिहारमध्ये दाखल केलेली एफआयआर योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushant singh rajput : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी CBIची एसआयटी, ४ अधिकाऱ्यांचा समावेश


सीबीआयने या प्रकरणाच्या तपासासाठी आधीच तयारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश येताच सुशांतच्या मृत्युच्या चौकशीसाठी एसआयटी जाहीर करण्यात आलीय. एसआयटीचे अध्यक्ष सीबीआयचे सहसंचालक मनोज शशिधर असतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि अतिरिक्त एसपी अनिल यादव यांचा या टीममध्ये समावेश आहे. हे सर्व सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी करतील.

- सीबीआय चौकशीची दिशा ही बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असेल. ज्यात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 341, 348, 380, 406, 420, 306 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- सीबीआयची SIT लवकरच मुंबई पोलिसांना पत्र लिहिणार आहे. या प्रकरणाची केस डायरी, घटना स्थळाचे फोटो, ऑटोप्सी रिपोर्ट, मुंबई पोलिसांचा फॉरेन्सिक रिपोर्ट आणि नोंदवलेल्या साक्षीदारांचे जबाब लवकरात लवकर पाठवण्याची विनंती सीबीआयकडून करण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये अलबेल? निमलष्करी दलाचे १० हजार जवान माघारी, केंद्राचा मोठा निर्णय

- सर्व कागदपत्र मिळाल्यानंतर सीबीआय एसआयटी मुंबईच्या वांद्रे येथे सुशांतच्या घराची पाहणी देखील करेल. ज्या ठिकाणी सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला होता, तेथे ही एसआयटी जाईल. विशेष म्हणजे सीबीआय सोबतच घटनास्थळी एक फॉरेन्सिक टीमदेखील असणार आहे. जी पुन्हा एकदा घटनास्थळावर पुरावे शोधण्याचा प्रयत्न करेल.

चीन-पाकच्या नजरेतही येणार नाही भारतीय सैन्याच्या वेगवान हालचाली, लडाखपर्यंत बांधणार हा नवा रस्ता

- सुशांतची हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या आधारावर एसआयटी सुशांतच्या प्लॅटमधील खोलीचा क्राइम सीन रिक्रिएट करेल. यासोबतच डमी टेस्ट देखील केली जाईल.

- त्या घटनेवेळी त्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब नव्याने नोंदवले जातील.

- या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांचीही सीबीआय टीमकडून चौकशी केली जाईल.

महत्वाचे लेख