अ‍ॅपशहर

सुषमा यांना एम्समधून डिस्चार्ज

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आज सायंकाळी सात वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. १० डिसेंबर रोजी सुषमा यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूतून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं.

Maharashtra Times 19 Dec 2016, 9:07 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushma swaraj discharged from aiims after recovery
सुषमा यांना एम्समधून डिस्चार्ज

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आज सायंकाळी सात वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. १० डिसेंबर रोजी सुषमा यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूतून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं.

एम्सच्या जनसंपर्क विभागाने सुषमा यांच्या डिस्चार्जनंतर एक निवेदन जारी केलं असून सुषमा यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं नमूद केलं आहे. सुषमा यांना डिस्चार्ज मिळाला असला तरी पुढील तीन महिने काळजी घ्यावी लागणार आहे. इन्फेक्शन टाळण्यासाठी त्यांनी कोणालाही भेटू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज