अ‍ॅपशहर

सुषमा स्वराज यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर स्वराज यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. सुषमा स्वराज यांना किडनी देणारी व्यक्ती त्यांच्या परिचितांपैकी नसल्याचं सूत्रांकडून समजतं.

Maharashtra Times 10 Dec 2016, 3:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushma undergoes kidney transplant at aiims
सुषमा स्वराज यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर स्वराज यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. सुषमा स्वराज यांना किडनी देणारी व्यक्ती त्यांच्या परिचितांपैकी नसल्याचं सूत्रांकडून समजतं.

सुषमा स्वराज यांना मधुमेहाचा त्रास असल्यानं ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. हे लक्षात घेऊन त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी प्रत्यारोपणातील तज्ज्ञ डॉक्टरांबरोबरच अन्य विभागातील डॉक्टरांचे एक पथक नेमण्यात आले होते. 'एम्स'चे संचालक डॉ. एम. सी. मिश्रा, व्ही. के. बन्सल आणि संदीप अग्रवाल यांच्यासह देशातील प्रख्यात शल्यविशारदांच्या पथकानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. आज सकाळी नऊ वाजता स्वराज यांना ऑपरेशन थियटरमध्ये नेण्यात आले. तब्बल पाच तास ही शस्त्रक्रिया चालल्याचं रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज