अ‍ॅपशहर

योगींना भेटायचंय?; अंघोळ करून सेंट लावून या!

तुम्हाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचंय?... मग आधी साबण, शॅम्पू लावून स्वच्छ आंघोळ करून या. पावडर लावा आणि सेंटही मारा! असं का? तर, आदित्यनाथांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यांचा तसा आदेश आहे. आपल्या साहेबांना कसलाही त्रास होऊ नयेत म्हणून हे अधिकारी त्यांची अशी काळजी घेत असल्याचं समोर आलं आहे.

Maharashtra Times 27 May 2017, 11:29 am
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take bath and scent before meeting cm yogi officials edict to mushar bastis residents
योगींना भेटायचंय?; अंघोळ करून सेंट लावून या!

तुम्हाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचंय?... मग आधी साबण, शॅम्पू लावून स्वच्छ आंघोळ करून या. पावडर लावा आणि सेंटही मारा! असं का? तर, आदित्यनाथांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यांचा तसा आदेश आहे. आपल्या साहेबांना कसलाही त्रास होऊ नयेत म्हणून हे अधिकारी त्यांची अशी काळजी घेत असल्याचं समोर आलं आहे.

आदित्यनाथांच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेबद्दल असलेल्या या कळकळीची अलिकडंच सर्वांना प्रचिती आली. यूपीच्या कुशीनगर जिल्ह्यातील मैनपूर कोट गावात २५ मे रोजी योगींचा दौरा आयोजित करण्यात आला होता. येथील मुसहर परिसरात आदित्यनाथांच्या हस्ते इन्सेफेलायटीस लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार होती. त्यांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी तिथं हजेरी लावली. संपूर्ण परिसराची पाहणी केली व परिसरातील जनतेला साबण, शॅम्पू आणि सेंट वाटले. सीएमना भेटण्यापूर्वी स्वच्छ अंघोळ करून सेंट मारून या, असे सक्त आदेशच त्यांनी दिले. तसंच आपलं घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याची ताकीदही दिली.

जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र आपल्याला यासंबंधी कोणतीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. मुसहर भागातील एका रहिवाशानं मात्र जिल्हा प्रशासनाचीही पोलखोल केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी काही दिवसांपूर्वीच प्रशासनानं या भागात नवीन शौचालय बांधल्याचं व गावातील रस्ते व रस्त्यावरील विजेच्या दिव्यांची दुरुस्ती केल्याचं सांगितलं.

यापूर्वीही अशाच एका घटनेमुळं सीएम योगी वादात सापडले होते. देवरिया जिल्ह्यातील बीएसएफच्या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी योगी पोहोचण्यापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांनी जवानाच्या घरात कारपेट अंथरून सोफा, एसीचीदेखील व्यवस्था केली होती. योगी त्या घरातून बाहेर पडताच या सर्व सोयीसुविधा तेथून काढूनही घेतल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज