अ‍ॅपशहर

काश्मीरसोबत बिहारही घ्या!: काटजूंची ऑफर

उरी हल्ला व काश्मीर प्रश्नावरून सध्या राजकारण पेटलं असताना माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल ओतलं आहे. काश्मीरचं स्वप्न सोडून द्या, असं भारतानं पाकला ठणकावलं असताना काटजू यांनी मात्र पाकिस्तानला काश्मीर देण्याची तयारी दाखवली आहे. 'पाकिस्तानला आम्ही काश्मीर द्यायला तयार आहोत. पण त्यांना काश्मीरसोबत बिहारही घ्यावं लागेल,' अशी अट घालून काटजूंनी बिहारचाही अपमान केला आहे.

Maharashtra Times 27 Sep 2016, 1:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take kashmir but only if you take bihar also
काश्मीरसोबत बिहारही घ्या!: काटजूंची ऑफर

उरी हल्ला व काश्मीर प्रश्नावरून सध्या राजकारण पेटलं असताना माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल ओतलं आहे. काश्मीरचं स्वप्न सोडून द्या, असं भारतानं पाकला ठणकावलं असताना काटजू यांनी मात्र पाकिस्तानला काश्मीर देण्याची तयारी दाखवली आहे. 'पाकिस्तानला आम्ही काश्मीर द्यायला तयार आहोत. पण त्यांना काश्मीरसोबत बिहारही घ्यावं लागेल,' अशी अट घालून काटजूंनी बिहारचाही अपमान केला आहे.

काश्मीर मुद्दा सोडवण्याचा फॉर्म्युला आपल्याकडं असल्याचा दावा करणारी पोस्ट काटजू यांनी फेसबुकवर टाकली आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानला एक पॅकेजच ऑफर केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये काटजू म्हणतात, 'पाकिस्तान्यांनो, चला आपण आपले मतभेद कायमचे मिटवू या. आम्ही तुम्हाला काश्मीर द्यायला तयार आहोत. पण एक अट आहे. काश्मीरसोबत तुम्हाला बिहारही घ्यावं लागेल. हे एक पॅकेज आहे. संपूर्ण पॅकेज तुम्हाला घ्यावं लागेल. एकटं काश्मीर मिळणार नाही.'

आग्रा शिखर परिषदेच्या वेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी परवेझ मुशर्रफ यांना हीच ऑफर दिली होती. पण मुशर्रफ यांनी ती नाकारून मूर्खपणा केला. आता पुन्हा आम्ही तुम्हाला ही ऑफर देतोय,' असा दावाही काटजू यांनी केला आहे.

काटजू एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी बिहारविषयी अनेक अपमानास्पद पोस्ट टाकल्या आहेत. 'अलाहाबाद विद्यापीठात मला इंग्रजी शिकवणारे फिराक गोरखपुरी एकदा म्हणाले होते की भारताला पाकिस्तानपेक्षा बिहारपासून जास्त धोका आहे. त्यांना काय म्हणायचं होतं हे अद्याप मला समजलेलं नाही.'

ही तर थट्टा!

काटजूंच्या या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. टीकेनंतर काटजूंनी घूमजाव केले असून केवळ थट्टेनं मी या पोस्ट टाकल्याचं म्हटलं आहे. 'लोकांनी न्यायालयात जनहित याचिका करून बिहारवर यापुढं विनोद केले जाऊ नयेत अशी मागणी करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज