अ‍ॅपशहर

जेएनयू प्रकरण घराघरांत पोचवा

‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांची माहिती उत्तर प्रदेशातील प्रत्येक घरी जाऊन द्या आणि लोकांना विचारा, की ते हे सहन करतील का,’ असे आदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले.

Maharashtra Times 27 Feb 2016, 4:08 am
‘उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार येईल’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take the jnu issue at every door
जेएनयू प्रकरण घराघरांत पोचवा




वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांची माहिती उत्तर प्रदेशातील प्रत्येक घरी जाऊन द्या आणि लोकांना विचारा, की ते हे सहन करतील का,’ असे आदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले.

लखनौ येथे ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. ‘अफजल हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है’; ‘भारत तेरी बरबादी तक जंग जारी रहेगी’; ‘भारत तेरे टुकडे होंगे’; ‘हर घर में अफजल पैदा होगा’ या भारतविरोधी घोषणा आहेत, की नाहीत, हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे,’ असे आव्हानही त्यांनी दिले.

शहा म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी असल्याचे राहुल गांधी ‘जेएनयू’त म्हणाले. मी त्यांना परत प्रश्न विचारतो, की या चार घोषणा देशविरोधी आहेत, की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? काँग्रेस आणि राहुल गांधींनी आता गप्प न राहता, त्यांची भूमिका स्पष्ट करावी. राहुलना मी हा प्रश्न गेले सहा दिवस विचारतो आहे; पण त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही.’

‘माध्यमांनीही राहुलना हा प्रश्न वारंवार विचारावा. आपल्या पक्षाचे विचारसरणी काय आहे, हे राहुल गांधी यांनी देशाला सांगावे,’ असे आव्हानही त्यांनी दिले. ‘जेएनयू स्टुडंट्स युनियन’चा नेता कन्हैय्या कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली केलेल्या अटकेचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना राहुल यांनी नुकताच पाठिंबा दिला होता आणि भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली विचारधारा थोपवत असल्याचा आरोपही केला होता.

‘उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार येईल’

‘उत्तर प्रदेशात पुढचे सरकार भाजपचेच असाल,’ असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. ‘राज्यात पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या,’ असे त्यांनी नमूद केले. ‘डिसेंबर २०१७पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांत पक्षाचे कार्यालय असेल. या कार्यालयांमध्ये ग्रंथालये, सोशल मीडिया रूम्स आणि कार्यकर्त्यांसाठी राहण्याची सोयही असेल,’ असे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज