अ‍ॅपशहर

NSA अजित डोवल आणि CIA प्रमुख बर्न्स यांच्यात दिल्लीत बैठक, तालिबानवर सल्लामसलत!

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याने बहुतेक देशांची सुरक्षेची चिंता वाढली आहे. भारतानेही सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेचे प्रमुख विल्यम बर्न्स यांच्यात बैठक झाली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Sep 2021, 5:20 pm
नवी दिल्लीः अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल (NSA Ajit Dobhal) आणि अमेरिकेच्या CIA चे प्रमुख आणि गुप्तहेर विल्यम बर्न्स यांची मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. अफगाणिस्तान चालवण्यासाठी तालिबानने नेत्यांच्या नावांची घोषणा मंगळवारी केली. यात अमेरिकेने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या नेत्याला पंतप्रधान करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम CIA प्रमुख आणि NSA अजित डोवल यांच्यात दिल्लीत बैठक, तालिबानवर सल्लामसलत!
taliban afghanistan nsa ajit doval and cia chief william burns meets in delhi


NSA अजित डोवल आणि अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संस्थेचे (CIA) प्रमुखांमध्ये जी चर्चा झाली त्याचा तपशील मिळू शकला नाही. पण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या मुद्द्यांवर सर्वोच्च प्राधान्याने चर्चा झाली.

तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवला त्यावेळी भरताने आपल्या दुतावासातील कर्मचाऱ्यांना सुखरुप मायदेशी आणले. पण रशिया आणि पाकिस्तानचे कर्मचारी तिथेच आहेत.

शत्रूला धडकी भरवणार भारताची नारीशक्ती! केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

अफगाणिस्तानमधील घटनाक्रमावर भारताच्या असलेल्या चिंतांवर अजित डोवल आणि सीआयए प्रमुखांमध्ये चर्चा झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवरून भारतातविरोधात कुठल्याही दहशतावादी कारवाया करू देऊ नये, असं भारताने तालिबानसमोर स्पष्ट केलं आहे. कतारची राजधानी दोहामध्ये भारताचे राजदूत आणि तालिबानच्या नेत्यामध्ये काही दिवसांपूर्वी औपचारीक बैठक झाली. या बैठकीत भारताने तालिबानसमोर आपले विचार मांडले. तसंच अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. तालिबानने भारताला या मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

'भारतात मुस्लीम कधीही बहुसंख्य होऊ शकत नाहीत'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज