मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
मल्याळम सिनेमातील एका आघाडीच्या अभिनेत्रीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच तामिळ सिनेमातील अभिनेत्री वरालक्ष्मी सुद्धा एका बड्या असामीच्या छळवणुकीची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. स्वत: वरालक्ष्मीनेच तिच्याशी झालेल्या या छळवणुकीची कहानी टि्वटरवर व्यक्त केली आहे.
वरालक्ष्मी ही दक्षिणेतील सुपरस्टार शरत कुमार यांची कन्या आहे. दक्षिणेतील अनेक अभिनेत्रींच्या विनयभंग आणि बलात्काराच्या घटना समोर येऊ लागल्यानंतर तिने सुद्धा तिच्याशी संबंधित ही घटना उघड केली आहे. एका मोठ्या न्यूज चॅनेलच्या प्रोग्रामिंग हेडने तिची छळवणूक केल्याचं तिनं स्पष्ट केलयं. 'आमच्या दोघांमध्ये एक मिटींग झाली होती. त्यावळे मिटींग संपायला अर्धा तास बाकी असतानाच त्याने आपण बाहेर भेटू शकतो का?' असं विचारलं. 'ही भेट अन्य वेगळ्या कारणांसाठीची असेल,' असे तो म्हणाला. त्यावेळी मी त्याला 'नाही' म्हणून सांगितले. त्यावर, 'म्हणजे सगळच संपलं असं समजायचं का?' असं तो म्हणाला. त्याचे हे उदगार ऐकून मला खुप राग आला.
वरालक्ष्मीने तिच्या आयुष्यात घडलेल्या या अनपेक्षित प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. 'मी अभिनेत्री आहे. स्क्रीनवर ग्लॅमरस जीवन जगते. पण याचा अर्थ नाही की कुणीही माझ्याशी चुकीच्या हेतूने चर्चा करावी. हे माझे आयुष्य आहे. माझे शरीर आहे आणि माझी इच्छा आहे,' असा संताप तिने व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करताना सतत वाढत जाणाऱ्या बलात्कारांच्या घटना आणि छळवणुकीच्या घटनांवर तिने चिंता व्यक्त केली.