अ‍ॅपशहर

तनुश्री परीक ‘बीएसएफ’मध्ये

देशाच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तनुश्री परीक (२५) या तरुण महिलेला हा मान मिळाला असून ती भारत-पाकिस्तानच्या सीमेवर पंजाब येथे तैनात असलेल्या तुकडीचे नेतृत्व करेल.

Maharashtra Times 26 Mar 2017, 1:29 am
ग्वाल्हेर: देशाच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तनुश्री परीक (२५) या तरुण महिलेला हा मान मिळाला असून ती भारत-पाकिस्तानच्या सीमेवर पंजाब येथे तैनात असलेल्या तुकडीचे नेतृत्व करेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tanushree parikh a lady officer is recruited for bsf
तनुश्री परीक ‘बीएसएफ’मध्ये


तनुश्री ही राजस्थानच्या बिकानेर येथील रहिवासी असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१४मध्ये घेतलेल्या परीक्षेत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. यानंतर तिची सीमा सुरक्षा दलात निवड झाली. तनुश्री ही सीमा सुरक्षा दलातील पहिलीच कॉम्बॅट ऑफिसर ठरली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या ६७ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या पासिंग आउट परेडचे संचलनही अनुश्रीने केले. येथील टेकनपूर येथे झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते.

सीमेवर तटबंदी सशक्त करणार

बांगलादेश आणि पाकिस्तान सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवून तटबंदी अधिक मजबूत करण्यासाठी योजना आखण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी दिली. संरक्षण दलांमध्ये प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज