अ‍ॅपशहर

लाखात मिळणारी नॅनो बंद होण्याच्या मार्गावर?

भारतीय बाजारात टाटा कंपनीच्या नॅनो कारची बरीच चर्चा होती. पण मागणी कमी झाल्यामुळं टाटा नॅनोच्या वितरकांनी कंपनीला नवीन ऑर्डर देणं बंद केलयं. अनेक वितरकांनी तर या कारची ऑर्डर घेणंच बंद केलं असून टाटा नॅनोच्या जागी टाटा टियागो, हेक्सा आणि नेक्सॉन या गाड्यांची मागणी वाढल्याचं सांगितलं आहे.

Maharashtra Times 27 Nov 2017, 3:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tata nano production may be closed as production and sales drop down
लाखात मिळणारी नॅनो बंद होण्याच्या मार्गावर?


भारतीय बाजारात टाटा कंपनीच्या नॅनो कारची बरीच चर्चा होती. पण मागणी कमी झाल्यामुळं टाटा नॅनोच्या वितरकांनी कंपनीला नवीन ऑर्डर देणं बंद केलंय. अनेक वितरकांनी तर या कारची ऑर्डर घेणंच बंद केलं असून टाटा नॅनोच्या जागी टाटा टियागो, हेक्सा आणि नेक्सॉन या गाड्यांची मागणी वाढल्याचं सांगितलं आहे.

२००८ मध्ये नॅनो ही सर्वसामान्यांची कार असं बिरुद मिरवत दिमाखात बाजारात दाखल झाली होती. एक लाखात मिळणाऱ्या कारची किंमत कालांतरानं वाढत गेली. लाखात मिळणारी कार आता २.५० लाख ते तीन लाखांपर्यंत मिळत असल्यानं ग्राहक या कारकडं पाठ फिरवताना दिसत आहेत.

ऑगस्ट महिन्यात १८० नॅनो कार वितरकांकडं पाठवण्यात आल्या होत्या. पण ऑक्टोबर मध्ये फक्त ५७ गाड्यांची मागणी आल्यानं या कारचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आल्याचं समजतंय. यावरून टाटांसाठी नॅनो हा तोट्याचा व्यवसाय ठरत असल्याचं दिसून येत आहे.

२८ नोव्हेंबर रोजी नवी टाटा नॅनो इलेक्ट्रिक वर्जनसह (EV) बाजारात येणार असून टाटाच्या नॅनो कारचं नाव बदलून 'जायेम नियो' (Jayem Neo) असं ठेवण्यात येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज