अ‍ॅपशहर

ध्वजारोहण करून येणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार

चंदीगडमध्ये सनदी अधिकाऱ्याच्या मुलीची छेड काढण्याचं प्रकरण ताजं असतानाच एका विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही विद्यार्थीनी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे चंदीगडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 15 Aug 2017, 3:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । चंदीगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teenager assaulted in chandigarh on independence day
ध्वजारोहण करून येणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार


चंदीगडमध्ये सनदी अधिकाऱ्याच्या मुलीची छेड काढण्याचं प्रकरण ताजं असतानाच एका विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही विद्यार्थीनी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे चंदीगडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

ही विद्यार्थीनी सकाळी शाळेत गेली होती. शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर घरी येत असताना ११ वाजता सेक्टर २३ मधील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क जवळील नाल्याच्या जवळ तिच्यावर बलात्कार करण्यात आला. विद्यार्थीनीवर बलात्कार करणारा आरोपी ४० वर्षाचा असल्याचं सांगण्यात येतं. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो जंगल परिसर असल्याचं सुत्रांनी सांगितलं. ही मुलगी ११ वर्षाची असून शॉर्टकटचा मार्ग म्हणून ती या मार्गाने येत होती.

या प्रकरणी पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिची चौकशी केली असता बरीच माहिती मिळाल्याचे चंदीगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक ईश सिंघल यांनी सांगितलं. पीडित मुलीचे आई-वडिल सेक्टर २४ मध्ये राहत असून या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी १०० क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिली, असं सूत्रांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज