अ‍ॅपशहर

गलवानमधील शहीद कर्नलची पत्नी झाली उपजिल्हाधिकारी, तेलंगण सरकारकडून नियुक्ती

भारत-चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये अजूनही तणावाची स्थिती आहे. चर्चेदरम्यान सैनिक मागे हटवण्यावर सहमती दर्शवणाऱ्या चीनने अजूनही सैनिक तिथेच ठेवले आहेत. या तणावादरम्यान गलवान खोऱ्यात गेल्या महिन्यात १५ जून भारत-चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले होते. आता शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली गेली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना हे निुक्तीचे पत्र दिले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2020, 6:25 pm
हैदराबादः पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षात कमांडींग ऑफिसर कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले होते. आता तेलंगण सरकारने त्यांच्या पत्नीची उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती केलीय. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी संतोष बाबू यांच्या पत्नीला सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र दिले. कर्नल यांच्या पत्नीची नेमणूक ही हैदराबाद किंवा जवळपासच्या भागात करावी, असे आदेशही मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम गलवानमधील शहीद कर्नलची पत्नी झाली उपजिल्हाधिकारी, तेलंगण सरकारकडून नियुक्ती


शहीद कर्नल संतोष बाबू यांची पत्नी ८ वर्षाची मुलगी आणि ३ वर्षाच्या मुलासोबत सध्या दिल्लीत राहत आहेत. संतोष बाबू हे शहीद झाल्यात सर्व प्रथम त्यांच्या पत्नीला माहिती झाले होते. संतोष बाबू यांची आई हैदराबादमध्ये राहते. आपल्या मुलाने हैदराबादमध्ये बदली करून घ्यावी, अशी त्यांची ईच्छा होता. याआधी तेलंगण सरकारने शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या कुटुंबाला ५ कोटी रुपयांची निधी देण्याची घोषणा केली होती.

संघर्षात २० जवान शहीद झाले होते

गेल्या महिन्यात गलवान खोऱ्यात सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. या संघर्षात कामांडींग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे एकूण २० जवान शहीद झाले. या चकमकीत कमीतकमी ४३ चिनी सैनिक मारले गेलेत. पण चीनने यासंदर्भातील माहिती लपवली आहे. सततच्या तणावामुळे कर्नल संतोष बाबू चिनी सैनिकांशी बोलण्यासाठी गेले. पण तिथून परतत असताना चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले.

मोदी सरकारचे देशात 'रेड राज'; केंद्रावर निशाणा साधत काँग्रेसचा संताप

चिनी सैनिक मागे हटले नाहीत; पाळत ठेवण्यासह भारताचा युद्धाच्या तयारीला वेग

काय आहे भारत-चीनमधील सीमावाद ?

गलवान खोऱ्यात घुसखोरी संपवण्यासाठी अनेक स्तरांवर चर्चा सुरू आहेत. चिनी सैनिकांची येथील उपस्थिती दार्बुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रोडला धोकादायक ठरत आहे. काराकोरम पर्वत रांगांच्या खिंडीपर्यंत तैनात असलेल्या जवानांना रसद पुरवठा करण्यासाठी हा रस्ता खूप महत्वाचा आहे. पँगाँग लेकमध्ये मुद्दा अधिक गुंतागुंतीचा आहे. येथे फिंगर ८ ते ४ दरम्यान चीनने ५० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त जमीन ताब्यात घेतली आहे. चीनने फिंगर ४ च्या तळाजवळ छावण्या उभारल्या आहेत. भारतीय लष्कराच्या गस्ती पथकाला त्या पुढे जाण्यास चीनने मज्जाव केला आहे. तर फिंगर ८ पर्यंत भारताचा भूभाग आहे. पण भारताची सीमा ही फिंगर ४ पर्यंतच असल्याचा चीनचा दावा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज