अ‍ॅपशहर

कॉल ड्रॉप: टेक्नॉलॉजीच्या मदतीने कंपन्या बनवतात मूर्ख?

आपल्या सेवेचा घसरलेल्या दर्जा लपवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी आता एक नव्या तंत्रज्ञानाचा आसरा घेतला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कॉलदरम्यान बोलता बोलता जर ग्राहकाचे कनेक्शन तुटले, किंवा मग दुसऱ्या बाजूने आवाज येईनासा झाला, तर मग अशा स्थितीत ग्राहकाचा कॉल कट न होता तो कनेक्टड असलेलाच दिसत राहतो

Maharashtra Times 29 May 2016, 6:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम telecoms using technology to cover up call drop
कॉल ड्रॉप: टेक्नॉलॉजीच्या मदतीने कंपन्या बनवतात मूर्ख?


आपल्या सेवेचा घसरलेल्या दर्जा लपवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी आता एक नव्या तंत्रज्ञानाचा आसरा घेतला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कॉलदरम्यान बोलता बोलता जर ग्राहकाचे कनेक्शन तुटले, किंवा मग दुसऱ्या बाजूने आवाज येईनासा झाला, तर मग अशा स्थितीत ग्राहकाचा कॉल कट न होता तो कनेक्टड असलेलाच दिसत राहतो

यापूर्वी जर फोनवर बोलत असलेली व्यक्ती खराब नेटवर्क असलेल्या भागात असेल तर त्याचा कॉल आपोआप कट व्हायचा आणि तो कॉल 'कॉल ड्रॉप' म्हणून गणला जायचा. कॉल ड्रॉप झाल्यामुळे ग्राहकाला त्या कॉलचे पैसे मोजावे लागत नव्हते. आता नव्या तंत्रज्ञानामुळे आपला कॉल जरी कट झालेला असला, पलिकडून आवाज येत नसला तरी ग्राहकाचा कॉल कनेक्टेडच दाखवला जातो आणि आपण तो कट केल्याशिवाय कट झालेला दिसत नाही. अशा परिस्थितीत जरी ग्राहकाला संभाषण करता आले नसले तरी देखील ग्राहकाकडून पूर्ण वेळेचे पैसे घेतले जातात.

दूरसंचार नेटवर्कशी संबंधित एका तपास अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले, ' टेलिकॉम ऑपरेटर रेडिओ-लिंक टेक्नॉलॉजी (आरएलटी) चा वापर करत आहेत. यामुळे त्यांना कॉल ड्रॉप लपवण्यात मदत मिळते. या काळात ग्राहक फोनवर बोलत राहतो आणि त्याचे त्याला पैसे मोजावे लागतात. या दरम्यान खरे म्हणजे ग्राहकाचा कॉल कृत्रिम नेटवर्कने जो़डलेला दाखवला जातो.'

या समस्येबाबत उद्योग संघटना असलेल्या 'सीओएआय' आणि 'ऑस्पी' यांना पाठवण्यात आलेल्या प्रश्नांची कोणतेही उत्तर मिळू शकलेले नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉल ड्रॉप सहीत खराब मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांना दोन लाख रूपयांपर्यंतचा दंड निश्चित केला आहे, हे विशेष. कॉल ड्रॉपचा हा मुद्दा अलिकडच्या काळात चर्चेत राहिलेला आहेय या संदर्भात दूरसंचार कंपन्यांना टीकेचा सामना करावा लागला आहे. मात्र ठिकठिकाणी मोबाइल टॉवर उभारण्याच्या मागणी मंजुरी मिळत नसल्यामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवली असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज