अ‍ॅपशहर

काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात सात ठार

जम्मू-काश्मीर बँकेची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर सोमवारी हिजबुल मुजाहिदीन संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवून पाच पोलिस व दोन बँक कर्मचाऱ्यांना ठार केले.

Maharashtra Times 2 May 2017, 4:20 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terrorist
काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात सात ठार


जम्मू-काश्मीर बँकेची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर सोमवारी हिजबुल मुजाहिदीन संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवून पाच पोलिस व दोन बँक कर्मचाऱ्यांना ठार केले. सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

धमाल हांजीपोरा येथून दुपारी कुलगाम जिल्ह्यातील बँकेच्या मुख्यालयात परतणारी व्हॅन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी घेरली. या व्हॅनमधील सर्वांना खाली उतरण्यास सांगण्यात आले. पाच पोलिस, बँकेचा एक शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक व एक कर्मचारी अशा सर्वांना रायफलीच्या धाकाने रांगेत उभे करण्यात आले व अगदी जवळून या सर्वांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला व एका पोलिसाचे रुग्णालयात निधन झाले. शहीद पोलिसांमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील चार रायफली लुटून नेल्याचे समजते. मात्र पोलिसांकडून त्यास दुजोरा मिळू शकला नाही. या हल्ल्यानंतर हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेने एका स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयात दूरध्वनी करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

दहशतवादी कृत्यांसाठी पैशांची बेगमी करण्यासाठी काश्मिरात अलीकडे दहशतवाद्यांनी बँकांना लुटण्याचे प्रकार सुरू केले आहेत. सोमवारच्या घटनेत मात्र बँकेच्या कॅशव्हॅनमध्ये रोख रक्कम होती का, हे अद्याप समजू शकलेले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज