अ‍ॅपशहर

श्रीनगर: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. मीर बाजार येथे पोलिसांच्या पथकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत. तर, दोन नागरिकही ठार झाले असल्याचे वृत्त आहे.

Maharashtra Times 6 May 2017, 10:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terrorist attack on police 2 policemen martyred
श्रीनगर: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद


जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. मीर बाजार येथे पोलिसांच्या पथकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत. तर, दोन नागरिकही ठार झाले असल्याचे वृत्त आहे.

मीर बाजार येथे पोलिसांचे गस्ती पथक आले असताना दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. मात्र, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले. तर, दोन नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्याशिवाय या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत.


2 policemen and 2 civilians killed, 4 injured, after a police convoy was attacked by terrorists in J&K's Kulgam pic.twitter.com/YzG7jez4rI — TIMES NOW (@TimesNow) May 6, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज