अ‍ॅपशहर

काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, गोळीबारात BJP सरपंच ठार

गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला एक पूर्ण होत असताना दुसरीकडे उद्या राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2020, 11:56 pm
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असताना काश्मीर खोऱ्यात दोन दहशतवादी हल्ले झाले. पहिला हल्ला कुलगाममध्ये झाला. या ठिकाणी भाजपच्या सरपंचाला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. तर पुलवामामध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन जवान गंभीर जखमी झाले. कुलगाममधील गोळीबारात सरपंचाचा मृत्यू झालाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी BJP सरपंचाला घातली गोळी


जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कोकपोरामध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. त्यांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाजपच्या सरपंचाला गोळी घातली. कुलगाममधील काझीगुंड येथे सरपंचावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

भाजप सरपंचावर घरावजवळ गोळीबार

कुलगाममध्ये सरपंचावर त्यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यात सरपंच गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर लष्कराचे जवान, सीआरपीएफचे जवान आणि पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

दुसरा हल्ला पुलवामातील काकपोरात

दहशतवाद्यांनी दुसरा हल्ला पुलवामातील काकपोरा भागात केला. तिथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला करत गोळीबार केला. या घटनेत दोन पोलीस गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल केलं गेलं. काश्मीर खोऱ्यातील या दोन घटनांनंतर संपूर्ण खोऱ्यात अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

राम मंदिरासाठी चांदीच्या ११ विटा पाठवणार, काँग्रेस नेत्याची घोषणा

राम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्हणाले...

कलम ३७० हटवण्याला एक वर्ष

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५ ऑगस्टला कलम ३७० हटवला होता. या निर्णयाला उद्या एक वर्ष होतोय. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. तसंच काश्मीर खोऱ्यात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज