अ‍ॅपशहर

rakesh pandita : काश्मीरमध्ये भाजप नेत्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, गोळ्या घालून केली हत्या

काश्मीरमध्ये दहशतावद्यांनी एका भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. ही घटना पुलवामामधील त्रालमध्ये घडली आहे. घटनेतर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2021, 3:04 am
गोविंद चौहान, श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षाच्या काउन्सिलरची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील काउन्सिलर होते. पोलिसांनी त्यांना सुरक्षेशिवाय बाहेर न जाण्याचा इशारा दिला होता. पण संध्याकाळी ते शेजाऱ्याच्या घरी गेले. दहशतवाद्यांनी तिथेच त्यांच्यावर गोळीबार केला. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rakesh Pandita
काश्मीरमध्ये भाजप नेत्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, गोळ्या घालून केली हत्या


हल्ल्यात शेजाऱ्याची मुलगीही जखमी झाली. हत्या झालेल्या भाजपचे नेते राकेश पंडिता हे काश्मीरमध्ये पक्षाचं काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होते. पक्षात तरुणांचा समावेश करण्यासाठी त्यांची मोठी भूमिका होती. काश्मीरमध्ये बऱ्याच दिवसांनी दहशतवाद्यांनी अशा प्रकारे भाजप नेत्याची हत्या केली आहे. राकेश पंडिता हे कुठल्यातरी कामासाठी आपले शेजारी मुश्ताक अहमद यांच्या घरी गेले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती आहे.

Cylinder Blast: उत्तर प्रदेशात भीषण सिलिंडर स्फोट; ७ ठार तर ६ गंभीर जखमी

घरात घुसून गोळीबार

दहशतवादी मुश्ताक अहमद यांच्या घरात घुसले आणि त्यांनी पंडिता यांच्यावर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात आसिफा मुश्ताक ही तरुणीही सापडली. ही मुलगी मुश्ताक यांची मुलगी आहे. दोघं गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी भाजप नेते राकेश पंडिता यांना मृत घोषित केलं. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस लष्कराच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर संपूर्ण परिसर घेरण्यात आला. शोध मोहीम सुरू करण्यात आली. पण दहशतवाद्यांची कुठलीही माहिती मिळाली नाही. राकेश पंडिता हे या भागातील भाजपचा एक मोठा चेहरा होते. काश्मीरमध्ये भाजप वाढण्याचे काम ते करत होते.

महत्वाचे लेख