अ‍ॅपशहर

‘बीफ फेस्टिव्हल’वरून कॉलेजमध्ये हाणामारी

आयआयटी मद्रास येथे आयोजित केलेल्या ‘बीफ फेस्टिव्हल’वरून कॅम्पसमध्ये अशांतता पसरली असून, फेस्टिव्हलमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी नऊ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Times 1 Jun 2017, 11:15 am
चेन्नई : आयआयटी मद्रास येथे आयोजित केलेल्या ‘बीफ फेस्टिव्हल’वरून कॅम्पसमध्ये अशांतता पसरली असून, फेस्टिव्हलमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी नऊ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर गोवंश हत्याबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विद्यार्थ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी कॅम्पसमध्ये निषेध मोर्चा निघाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the college is struggling with the beef festival
‘बीफ फेस्टिव्हल’वरून कॉलेजमध्ये हाणामारी


फेस्टिव्हलमध्ये भाग घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप नऊ विद्यार्थ्यांवर आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी काही विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. आयआयटी मद्रासच्या बाहेर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली; तसेच गोमांस खाल्ले. या प्रकरणी संस्थेच्या अधिष्ठात्यांनी चौकशी समिती नेमली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज