अ‍ॅपशहर

अहवालफुटीमुळे न्यायालय संतप्त

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाला दिलेल्या उत्तरातील काही अंश माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे नाराज होऊन मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणाची सुनावणी २९ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

Maharashtra Times 21 Nov 2018, 12:58 am
चौकशी अहवालातील अंश प्रसिद्ध झाल्याने नाराजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the court aggravated the report
अहवालफुटीमुळे न्यायालय संतप्त


म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाला दिलेल्या उत्तरातील काही अंश माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे नाराज होऊन मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणाची सुनावणी २९ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

केंद्रीय दक्षता आयोगाने आलोक वर्मा यांची चौकशी करून सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केलेल्या सीलबंद अहवालातील काही अंश माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. ही माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्न सरन्यायाधीश गोगोई यांनी मंगळवारी आलोक वर्मा यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ फली नरीमन यांना विचारला. त्याची आपल्याला कल्पना नसल्याचे नरीमन यांनी सांगितले आणि अहवालातील माहिती बाहेर पोहोचविणाऱ्याला न्यायालयात हजर करावे, अशी मागणी केली. त्यावर तुमच्यापैकी कोणीही सुनावणीसाठी पात्र नाही, अशी संतप्त शेरेबाजी करून सरन्यायाधीश गोगोई यांनी या प्रकरणाची सुनावणी २९ नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली.

सीबीआयमध्ये उफाळलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे आलोक वर्मा, तसेच विशेष संचालक राकेश अस्थाना यांना २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री दीर्घ रजेवर पाठवून त्यांच्या जागी हंगामी संचालक म्हणून नागेश्वर राव यांची केंद्रीय दक्षता आयुक्तांनी नियुक्ती केली होती. या निर्णयाला वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वर्मा यांच्यावरील आरोपांची केंद्रीय दक्षता आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनाईक यांच्या देखरेखीखाली चौकशी केली असून त्याचा सीलबंद अहवाल सादर केला आहे.

सुनावणी लांबणीवर

या अहवालाच्या प्रती आलोक वर्मा, अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ आणि सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांना सीलबंद स्थितीतच देण्यात आल्या होत्या आणि त्यातील तपशीलाची बाहेर वाच्यता करू नका, असे न्या, गोगोई यांनी बजावले होते. त्यानंतरही आलोक वर्मा यांनी अहवालातील आरोपांना दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अहवालातील अंश प्रसिद्ध झाल्यामुळे न्या. गोगोई संतप्त झाले आणि त्यांनी मंगळवारची सुनावणी स्थगित केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज