बर्डवान (पश्चिम बंगाल) : अज्ञातांनी केलेल्या गोळीबारामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक स्थानिक नेता सोमवारी मृत्युमुखी पडला असून आणि एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. पश्चिम बर्डवान जिल्ह्यातील सरस्वतीगंज परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. संदीप घोष असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून जयदीप बॅनर्जी जखमी झाला आहे. पक्षाच्या एका बैठकीनंतर हे दोघे परतत असताना हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित हल्ला तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले असून भाजपमधील अंतर्गत स्पर्धेतून हा हल्ला झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजप नेत्याची हत्या
अज्ञातांनी केलेल्या गोळीबारामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक स्थानिक नेता सोमवारी मृत्युमुखी पडला असून आणि एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे...
PTI 11 Dec 2018, 4:00 am