अ‍ॅपशहर

काश्मीर खोऱ्यात २७३ दहशतवादी सक्रीय

गेल्या आठवड्यात सुरक्षा एजन्सीने एक यादी तयार केली असून या यादीनुसार काश्मीर खोऱ्यात २७३ दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी सक्रीय असल्याचे म्हटले आहे. २७३ सक्रीय दहशतवाद्यांत १५८ दक्षिण काश्मीरमधून, ९६ उत्तर काश्मीरमधून आणि १९ मध्य काश्मीरमध्ये सक्रीय आहेत. सर्वच्या सर्व दहशतवादी हे लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद आणि अल बद्र या दहशतवादी संघटनेचे आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2022, 7:06 am
श्रीनगरः गेल्या आठवड्यात सुरक्षा एजन्सीने एक यादी तयार केली असून या यादीनुसार काश्मीर खोऱ्यात २७३ दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी सक्रीय असल्याचे म्हटले आहे. २७३ सक्रीय दहशतवाद्यांत १५८ दक्षिण काश्मीरमधून, ९६ उत्तर काश्मीरमधून आणि १९ मध्य काश्मीरमध्ये सक्रीय आहेत. सर्वच्या सर्व दहशतवादी हे लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद आणि अल बद्र या दहशतवादी संघटनेचे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terrorist
काश्मीर खोऱ्यात २७३ दहशतवादी सक्रीय


लष्कर ए तोयबाचे ११२ दहशतवादी हे या यादीत अव्वल क्रमांकावर आहेत. त्यानंतर हिजबुल मुजाहिद्दीन (१००), जैश ए मोहम्मद (५८) आणि अल बद्र (३) यांचा क्रमांक आहे. ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर सीमेवरून घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत. तसेच घुसखोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. काश्मीरमध्ये सध्या शांतता असल्याने दहशतवाद्यांना एकत्रित तसेच काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवण्यसाठी वेळ मिळाला आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचे निर्देश मिळताच हे दहशतवादी सुरक्षा दलावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता, सूत्रांनी वर्तवली आहे.

आगामी काही दिवस किंवा आठवड्यानंतर सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात चकमक पाहायला मिळू शकते. दहशतवादी हे पुलवामा हल्ल्यासारखा हल्ला करण्याची शक्यता करण्याची भीतीही सूत्रांनी वर्तवली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज