अ‍ॅपशहर

महिलांचा अवमान; शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

काँग्रेस नेते, खासदार शशी थरूर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हिंदू समाजातील महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तिरुवनंतपूरम कोर्टाने थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे थरूर यांच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Dec 2019, 4:04 am
त्रिवेंद्रम: काँग्रेस नेते, खासदार शशी थरूर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हिंदू समाजातील महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तिरुवनंतपूरम कोर्टाने थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे थरूर यांच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shashi-Tharoor


शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. याप्रकरणात वकिलांमार्फत थरूर कोर्टात उपस्थित राहिले नाही, त्यामुळे कोर्टाला त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करावं लागल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

यापूर्वी ट्विटरवर भारताचा चुकीचा नकाशा अपलोड केल्यामुळे थरूर यांना टीकेला सामोरे जावं लागलं होतं. केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी थरूर यांनी एक ट्विट केलं होतं. त्यातील नकाशात त्यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनला भारताचा भाग म्हणून दाखवलच नव्हतं. त्यावरून थरूर सोशल मीडियावर ट्रोल झाले होते, तर भाजपने या मुद्द्याला हवा देत थरूर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या ट्विटवरून वातावरण तापल्यामुळे अखेर थरूर यांना हे ट्विट डिलिट करावं लागलं होतं.

थरूर यांच्याकडून हिंदुत्वाचा अपमान: इराणी

इंदिरा इज इंडिया...शशी थरूर झाले ट्रोल

दरम्यान, त्याआधीही 'इंदिरा इज इंडिया'वरून थरूर ट्रोल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची चेष्टा करताना थरूर यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख 'इंडिया गांधी' असा करून सोशल मीडियावर हलकल्लोळ उडवून दिला होता. त्यामुळे 'ट्विटर'वर थरूर यांना ट्रोल करण्यात आले होते. अर्थात, थरूर यांनी ही चूक मुद्दाम केली, की ती 'टायपिंग मिस्टेक' होती, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र, मोदींची थट्टा करायला गेलेल्या थरूर यांचीच सोशल मीडियावर या निमित्ताने थट्टा उडविण्यात आली होती.


शशी थरूर यांनी पुन्हा केले पंतप्रधानांचं कौतुक!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज