अ‍ॅपशहर

salman khurshid : घरावर हल्ला; सलमान खुर्शीद म्हणाले, 'हा हल्ला हिंदू धर्मावर, माझ्यावर नव्हे'

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे. या वादातूनच खुर्शीद यांच्या नैनीताल येथील घरावर हल्ला झाला. हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. तर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2021, 7:32 am
नवी दिल्लीः काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचे 'सनराइज ओवर अयोध्‍या: नेशनहुड इन आवर टाइम्‍स'... या पुस्तकावरून वादाला तोंड फुटलं आहे. खुर्शीद यांनी पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली आहे. यावरून वाद सुरू झाला आहे. खुर्शीद यांच्या नैनीताल येथील घरावर काहींनी हल्ला केला. दगडफेक करत घर पेटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. सलमान खुर्शीद यांनीही हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम this attack is not on me but on hindu religion says congress leader salman khurshid
घरावर हल्ला; सलमान खुर्शीद म्हणाले, 'हा माझ्यावर नव्हे तर हिंदू धर्मावर हल्ला'


थरूर यांनी केला हल्ल्याचा निषेध

हा हल्ला लाजीरवाणा आहे. खुर्शीद हे बडे राजकीय नेते आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आणि कायम देशात उदारमतवादी, सर्वसमावेशी दृष्टीकोन मांडला आहे. आपल्या राजकारणात असहिष्णुतेच्या वाढत्या प्रभावाला सत्ताधारी कारणीभूत असून याची निषेध केली पाहिजे, असं शशी थरूर यांनी ट्विट केलं आहे.
salman khurshid home vandalized : पुस्तकावरून राडा; काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचे घर पेटवले, दगडफेक
काय म्हणाले सलमान खुर्शीद?

अशा प्रकारचे कृत्य करणारे हे हिंदू धर्माचे असूच शकत नाही, असं आपण आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. हिंदू धर्म हा महान आहे. हिंदू धर्माने देशाला अतिशय सुंदर संस्कृती मिळाली आहे. मला हिंदू धर्मावर अभिमान आहे. हा हल्ला माझ्यावर नाही तर हिंदू धर्मावर आहे, असं काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले.

owaisi targets amit shah : 'आम्ही ब्रेडला जॅम लावून खातो, तुम्ही कोणत्या जॅमबद्दल बोलताय...' शहांवर ओवेसींचा निशणा

महत्वाचे लेख