अ‍ॅपशहर

...अन् त्यांनी किंग कोब्राला थंडगार पाणी पाजलं!

तहानलेल्याला पाणी पाजणं ही आपली संस्कृती आहे आणि प्राणिमात्रांवर दया करणं हा मानवताधर्म आहे. त्याला अनुसरूनच दक्षिण भारतातील कैगा गावातील पोलिसांनी चक्क किंग कोब्राला थंडगार पाणी पाजलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Maharashtra Times 30 Mar 2017, 2:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम this video of a thirsty cobra calmly drinking water from a bottle is insane
...अन् त्यांनी किंग कोब्राला थंडगार पाणी पाजलं!


तहानलेल्याला पाणी पाजणं ही आपली संस्कृती आहे आणि प्राणिमात्रांवर दया करणं हा मानवताधर्म आहे. त्याला अनुसरूनच दक्षिण भारतातील कैगा गावातील पोलिसांनी चक्क किंग कोब्राला थंडगार पाणी पाजलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांच्या धाडसाला आणि माणुसकीला सगळेच सलाम करताहेत.

चैत्राची चाहूल लागत असतानाच देशाच्या अनेक भागात वैशाख वणवा पेटला आहे. पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळत आहेत. प्राणीही त्याला अपवाद नाहीत. त्यांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. ओढे, नाले आटल्यानं पाण्याच्या शोधात त्यांना वणवण फिरावं लागतंय.

असाच तहानेनं व्याकूळ झालेला एक किंग कोब्रा कैगा गावात शिरला. महाभयंकर साप गावात आल्याच्या बातमीनं स्वाभाविकच हाहाकार उडाला. गावकरी, सर्पमित्र, पोलीस त्याला शोधायला धावल्यानं तो लगेचच सापडला. १२ फूट लांबीचा हा खतरनाक साप पाहून अनेकांचे डोळे फिरले. पण, कोब्राची अवस्था पाहून, तो पाण्यासाठी गावात आल्याचं सर्पमित्रांच्या लक्षात आलं. इतक्यात, एका पोलिसानं थंडगार पाण्याची बाटली मागवली आणि न घाबरता कोब्राला पाणी पाजलं. ते दृश्य पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

तुम्ही प्रत्यक्षच बघा हा थरारक आणि तितकाच हळवा प्रसंग...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज