अ‍ॅपशहर

हृदयद्रावक! रामनवमीच्या मिरवणुकीत अनर्थ; तीन तरुणांचा जीव गेला; जल्लोषाच्या जागी आक्रोश

रामनवमीच्या मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेत तीन तरुणांचा जीव गेला आहे. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे जल्लोषाची जागा आक्रोशानं घेतली. गावावर शोककळा पसरली.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2023, 5:01 pm
जयपूर: राजस्थानात रामनवमी उत्सवादरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रामनवमीनिमित्त गुरुवारी कोटा येथे मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या तिघांचा करंट लागल्यानं मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन जण गंभीर झाले. सुलतानपूरमधील कोटडादीप गावात ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kota ram navmi


आखाड्यातील तरुण त्यांची कला सादर करत असताना हा प्रकार घडला. एका तरुणाच्या हातातील चक्र वरून जाणाऱ्या हायपरटेंशन वायरवर अडकलं. त्यानंतर करंट पसरला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली. आनंदावर विरजण पडलं आणि परिसरावर शोककळा पसरली. शोभायात्रेत कला सादर करताना तरुणाचा हात ११ केव्ही हायटेंशन वायरला लागला. यानंतर करंट पसरला आणि तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोटा येथे हलवण्यात आलं. तिथे उपस्थित असलेल्यांनी काठी आणि पाणी टाकून तरुणांचा वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेचा शॉक इतका जोरदार होता की अनेक जण जागीच बेशुद्ध पडले. यानंतर एकच गोंधळ उडाला.
लग्नानंतर ३ महिन्यांनी माहेरी गेलेल्या तरुणीनं आयुष्य संपवलं; विरहात पतीचं टोकाचं पाऊल
बेशुद्ध पडलेल्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना तातडीनं सुलतानपूरमधील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी तिन्ही तरुणांना मृत घोषित केलं. ललित, अभिषेक आण महेंद्र अशी मृतांची नावं आहेत. जखमी असलेल्या हिमांशु, राधेश्याम आणि अमित यांना कोटा येथील एमबीएस रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. जिल्हाधिकारी ओ. पी. राजभर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कवेंद्र सागर यांनी कोटा येथील एमबीएस रुग्णालय गाठून जखमींची चौकशी केली. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करण्याचे आदेश दिले. या घटनेची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कार्यवाहीचे आदेश देण्यात येतील, असं पोलीस म्हणाले.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख