अ‍ॅपशहर

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी शनिवारी कंठस्नान घातले. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती. यातील दोन दहशतवादी सकाळी ठार झाले. त्यांचा आणखी एक सहकारी तेथे लपून बसला होता. मात्र दुपारनंतर त्यालाही ठार मारण्यात आले.

Maharashtra Times 16 Jul 2017, 12:53 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three jem terrorists killed in encounter in south kashmirs tral area
तीन दहशतवाद्यांना कंठस्नान


जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी शनिवारी कंठस्नान घातले. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती. यातील दोन दहशतवादी सकाळी ठार झाले. त्यांचा आणखी एक सहकारी तेथे लपून बसला होता. मात्र दुपारनंतर त्यालाही ठार मारण्यात आले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. ही कारवाई म्हणजे या संघटनेसाठी मोठा झटका असल्याचे हा अधिकारी म्हणाला. ही कारवाई सुरू असताना स्थानिकांनी सुरक्षारक्षकांवर दगडफेक केली. दरम्यान, राजौरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज