अ‍ॅपशहर

बापरे! ३ महिन्यांच्या बाळाला करोनाची लागण

करोना: उत्तर प्रदेशातील बस्ती येथे आज सोमवारी १५५ सॅम्पल्सची तपासणी करण्यात आली. यात बस्तीमधील एका अवघ्या ३ महिन्यांच्या चिमुकल्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2020, 3:55 pm
बस्ती: उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एका ३ महिन्यांच्या मुलाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चिमुकल्यावर बीआरडी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात ज्या पहिल्या करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला, त्याच रुग्णाचा हा चिमुकला नातेवाईक आहे. या चिमुकल्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहोचली आहे. उत्तर प्रदेशातील हॉटस्पॉट घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत बस्ती जिल्ह्याचाही समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus


बस्ती जिल्ह्यातील तुरकहिया भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. त्या व्यक्तीला गोरखपूर येथील बीआरडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचा ३० मार्च या दिवशी मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशात करोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू होता. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर परिसर सील करण्यात आला होता.

याच व्यक्तीच्या नातेवाईकाच्या ३ महिन्यांच्या मुलाला करोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर ११ एप्रिलला त्याचे सॅम्पल तपासणीसाठी बीआरडी हॉस्पिटलमध्ये पाठण्यात आले. यात या चिमुकल्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मुलाची आई आणि इतर लोकांचे सॅम्पल देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांच्या रिपोर्ट्सची प्रतीक्षा आहे.

पुन्हा धाकधूक वाढली; मोदी उद्या देशाला संबोधित करणार


शनिवार आणि रविवारी बीआरडी हॉस्पिटलमध्ये एकूण १५५ सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांपैकी १५१ सॅम्पल्सचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. या चिमुकल्यासह आता जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

तो मुंबईहून वाराणसीला पायी गेला, घरात घेतलेच नाही

लॉकडाउन: 'त्याने' मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज