अ‍ॅपशहर

लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; ३ अधिकारी ठार

पश्चिम बंगालमध्ये सुखनाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन अधिकारी ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पायलट आणि तीन अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये होते. एक ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी गंभीर आहे.

Maharashtra Times 30 Nov 2016, 2:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three officers killed in army cheetah chopper crash
लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; ३ अधिकारी ठार


पश्चिम बंगालमध्ये सुखनाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन अधिकारी ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ​ पायलट आणि तीन अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये होते. एक ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी गंभीर आहे.

लष्कराचे हे चित्ता हेलिकॉप्टर होते. हिंदुस्थान ऐरोनॉटिक्स लि. च्या मते, हे पाच आसनी हेलिकॉप्टर लष्कराच्या ताफ्यातले विविध प्रकारचे वजन, गुरुत्वाकर्षणमध्य आणि उंचीवर चांगली कामगिरी बजावणारे आहे. समुद्रसपाटीवरून सर्वाधिक उंचीवर उडणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये चित्ता हेलिकॉप्टरने जागतिक विक्रम नोंदवला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज