अ‍ॅपशहर

आसाम: दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद

आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत, तर चार जखमी झाले आहेत. उल्फाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं समजतं.

Maharashtra Times 19 Nov 2016, 11:42 am
मटा ऑनलाइन वृत्त । गुवाहाटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three soldiers killed in ied explosion in assam
आसाम: दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद


आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत, तर चार जखमी झाले आहेत. उल्फाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं समजतं.

तिनसुकिया जिल्ह्यातील पेनगेरी इथं सकाळी साडेपाचच्या सुमारास हा हल्ला झाला. सुरक्षा दलाचा एक ताफा पेंगरी येथून जात असताना दहशतवाद्यांनी त्या रस्त्यावर तीव्र क्षमतेचा भू-सुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळं जवानांचा ताफा जागीच थांबल्या. ही संधी साधून दहशतवाद्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडून बेछूट गोळीबार केला. त्यात सात जवान जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तीन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवाद्यांशी अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं दिली.
#NEOps. IED blast,Tinsukia Update. Three Soldiers martyred & Four Soldiers Injured. Search Operation is on @adgpi — EasternCommand_IA (@easterncomd) November 19, 2016 उल्फा अर्थात, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही आसाममधील फुटीरतावादी संघटना आहे. केंद्र सरकारनं १९९० साली या संघटनेला दहशतवादी घोषित करून त्यावर बंदी घातली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज