अ‍ॅपशहर

'ठुमरीची राणी' गिरिजा देवी यांचे निधन

ठुमरी गायनावर विलक्षण हुकूमत असलेल्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे आज रात्री ८.५५ वाजता वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गिरिजा देवी यांना कोलकातातील बी. एम. बिर्ला नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ८८ वर्षांच्या होत्या.

Maharashtra Times 24 Oct 2017, 11:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thumri queen girija devi dies in kolkata
'ठुमरीची राणी' गिरिजा देवी यांचे निधन

ठुमरी गायनावर विलक्षण हुकूमत असलेल्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे आज रात्री ८.५५ वाजता वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गिरिजा देवी यांना कोलकातातील बी. एम. बिर्ला नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ८८ वर्षांच्या होत्या.

आप्तमंडळींमध्ये 'आपाजी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गिरिजा देवी यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

गिरिजा देवी बनारस आणि सेनिया घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांनी शास्त्रीय गायनाचं पूर्ण शिक्षण वाराणसीतच घेतलं. ठुमरी गायन प्रकारावर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. त्यामुळेच 'ठुमरीची राणी' अशीही त्यांची ओळख झाली होती.

गिरिजा देवी यांनी 'ऑल इंडिया रेडिओ अलाहाबाद'वर १९४९मध्ये पहिला कार्यक्रम केला आणि त्यानंतर त्यांच्या गायनाचा प्रवास अखंड सुरू राहिला. गिरिजा देवी यांना १९७२मध्ये पद्मश्री, १९८९मध्ये पद्मभूषण आणि १९८९मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच संगीत नाटक अकादमी फेलोशीपही मिळाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज