अ‍ॅपशहर

भाजप जिंकला तर आंदोलन मागे घेईन: हार्दिक

गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा धुरळा संपला असला तरी राजकीय नेत्यांचं एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देणं अजूनही सुरूच आहे. 'सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपने किमान दहा जागा जिंकून दाखवाव्यात पटेलांसाठी सुरू केलेलं आरक्षण आंदोलन मागे घेईन,' असं आव्हान पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने भाजपला दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2017, 10:49 am
अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम till end stir if bjp wins 10 srashtra kutch seats says bjp
भाजप जिंकला तर आंदोलन मागे घेईन: हार्दिक

गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा धुरळा संपला असला तरी राजकीय नेत्यांचं एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देणं अजूनही सुरूच आहे. 'सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपने किमान दहा जागा जिंकून दाखवाव्यात पटेलांसाठी सुरू केलेलं आरक्षण आंदोलन मागे घेईन,' असं आव्हान पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने भाजपला दिलं आहे.

गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपण्यापूर्वी साबरकांठा जिल्ह्यातील इदर टाऊनमध्ये आयोजित एका सभेत हार्दिकनं हे आव्हान दिलं. 'सौराष्ट्रामध्ये मी बऱ्याच दिवसांपासून प्रचार करत आहे. इथल्या लोकांमध्ये भाजपविरोधात असंतोष आहे. सौराष्ट्र-कच्छमध्ये एकूण ५४ जागा आहेत. या ठिकाणी भाजपनं दहा जागा जरी जिंकल्या तरी मी माझं आंदोलन मागे घेईन,' अशी भीष्म प्रतिज्ञा हार्दिकने केली.

यावेळी हार्दिकने अपक्ष उमेदवार किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करू नका, असं आवाहनही मतदारांना केलं. 'अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार ही भाजपचीच माणसं आहेत. भाजप आणि काँग्रेस दरम्यानच मुख्य लढाई आहे. जर तुम्हाला भाजपला मतदान करायचं नसेल तर काँग्रेस हाच पर्याय असून काँग्रेसला मतदान करा,' असं आवाहनही त्याने केलं.

भाजपची रावणाशी तुलना

यावेळी हार्दिक पटेलने भाजपची रावणाशी तुलना केली. 'रावणालाही अहंकाराची बाधा झाली होती. मात्र नंतर त्याचे गर्वहरण झाले. लंका सुद्धा विकसित होती. पण रावणाच्या अहंकारामुळे लंका बुडाली. आताही परिस्थिती बदलेली नाही. सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या राज्यकर्त्यांना पराभूत करण्यासाठी संपूर्ण गुजरातची जनता सज्ज झाली आहे. अनेक वर्षांपासून गुजराती जनतेवर अन्याय सुरू आहे. म्हणूनच भाजपचा पराभव निश्चित आहे, असा दावाही त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज