अ‍ॅपशहर

'सोनिया थकल्यात, जबाबदारी सोडावी'

लोकसभा निवडणुकीनंतर राज्या-राज्यांत होणाऱ्या काँग्रेसच्या पराभवामुळं पक्षनेतृत्वाविरोधात उठणाऱ्या आवाजाला अधिकाधिक धार आली आहे. काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनंतर आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही नेतृत्वबदलाची मागणी केली आहे. 'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आता थकल्या आहेत. त्यांनी नव्या पिढीकडं जबाबदारी सोपवायला हवी,' असं सिंग यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 30 May 2016, 10:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम time for sonia to make way for rahul and priyanka amarinder singh
'सोनिया थकल्यात, जबाबदारी सोडावी'

लोकसभा निवडणुकीनंतर राज्या-राज्यांत होणाऱ्या काँग्रेसच्या पराभवामुळं पक्षनेतृत्वाविरोधात उठणाऱ्या आवाजाला अधिकाधिक धार आली आहे. काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनंतर आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही नेतृत्वबदलाची मागणी केली आहे. 'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आता थकल्या आहेत. त्यांनी नव्या पिढीकडं जबाबदारी सोपवायला हवी,' असं सिंग यांनी म्हटलं आहे.

'सीएनएन न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत अमरिंदर सिंग यांनी पक्षाच्या व नेतृत्वाच्या सद्यस्थितीविषयी आपली परखड मतं मांडली. 'मी सोनिया गांधी यांच्यासोबत काम केलंय. त्या खूपच उत्तम नेत्या आहेत. पण आता त्यांचं वय ७० झालं आहे. त्या थकल्या आहेत. नव्या पिढीला पुढं आणण्याची वेळ झाली आहे. सोनियांनी स्वत:हून ही जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडं सोपवल्यास चांगलंच आहे,' असं सिंग म्हणाले. 'अधिकार आणि जबाबदारी आल्यानंतर राहुल गांधी हे मजबूत नेते म्हणून समोर येतील. मी राहुल यांच्या वडिलांबरोबरही काम केलंय. ते सुद्धा राहुलसारखेच होते. राहुलही बदलतील,' असं अमरिंदर म्हणाले. राज्या-राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी लढण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हायकमांडनं जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत,' असंही अमरिंदर यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज