अ‍ॅपशहर

टार्गेट पंतप्रधान मोदी; राहुलनंतर विरोधी पक्षांचाही मोदींवर हल्ला

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘सहारा’कडून पैसे घेण्याचा सनसनाटी आरोप केल्यानंतर देशातील इतर विरोधी पक्षांनीही आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. एकीकडे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली असताना, दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंतप्रधान मोदींना राजीनामा देण्याचे आवाहन करत आरोपाच्या निष्पक्ष चौकशीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी केली आहे.

Maharashtra Times 21 Dec 2016, 10:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tmc aap and congress takes on pm modi over the allegations of corruption by rahul gandhi
टार्गेट पंतप्रधान मोदी; राहुलनंतर विरोधी पक्षांचाही मोदींवर हल्ला

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘सहारा’कडून पैसे घेण्याचा सनसनाटी आरोप केल्यानंतर देशातील इतर विरोधी पक्षांनीही आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. एकीकडे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली असताना, दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंतप्रधान मोदींना राजीनामा देण्याचे आवाहन करत आरोपाच्या निष्पक्ष चौकशीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी केली आहे.

राहुल यांनी केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाने देखील 'गंगा अब मैली हो चुकी है' असे सूचक वक्तव्य केले आहे.

गरज पडल्यास सीबीआय चौकशी व्हावी- तृणमूल काँग्रेस

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आरोपांची पूर्ण चौकशी व्हायला हवी अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी केली आहे. गरज पडल्यास या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

गंगा मैली हो गई हैं- काँग्रेस

पंतप्रधान मोदी हे गंगेसारखे पवित्र आहेत या भाजपच्या प्रतिक्रियेची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. यावर पलटवार करताना काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले, ' गंगा तर मैली झाली आहे. म्हणून तर गंगा स्वच्छता अभियान सुरू करावे लागले आहे. पंतप्रधान मोदी यांची विश्वसनीयता, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा पणाला लागली आहे. आम्ही मोदींचा खूपच आदर करतो.'

'आडवाणींप्रमाणे मोदींनी राजीनामा द्यावा'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना लालकृष्ण आडवाणींचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला आहे. आडवाणींचे उदाहरण देत केजरीवाल म्हणाले, 'पंतप्रधानांनी आडवाणींकडून शिकण्याची गरज आहे. आडवाणींवरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सिद्द झाल्यानंतरच आडवाणींनी पुन्हा पद स्वीकारले.'

'सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी चौकशी'

भ्रष्टाचाराचे आरोप होणे ही गंभीर गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची तत्काळ आणि निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली. या आरोपांत तथ्य आहे का, याचा खुलासा पंतप्रधान मोदींनी करावा असे आवाहनही त्यांनी पंतप्रधानांना केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज