अ‍ॅपशहर

इलेक्शन किंग टी.एन. शेषन वृद्धाश्रमात

देशातील निवडणूक प्रणालीचा चेहरामोहरा बदलणारे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त आणि इलेक्शन किंग टी.एन. शेषन सध्या वृद्धाश्रमात आयुष्य घालवत आहेत. त्यांना स्मृतिभ्रंशाचाही त्रास होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2018, 2:37 pm
लखनऊ :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tn seshan former chief election commisioner old age home
इलेक्शन किंग टी.एन. शेषन वृद्धाश्रमात


देशातील निवडणूक प्रणालीचा चेहरामोहरा बदलणारे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त आणि इलेक्शन किंग टी.एन. शेषन सध्या वृद्धाश्रमात आयुष्य घालवत आहेत. त्यांना स्मृतिभ्रंशाचाही त्रास होत आहे.

टी.एन. शेषन यांनी वयाची ८५ गाठली आहे. त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास जाणवतो आहे. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वृद्धाश्रमात ठेवले आहे. तीन वर्ष वृद्धाश्रमात घालविल्यानंतर ते घरी आले. मात्र घरात करमत नसल्याने आजही ते संपूर्ण दिवस वृद्धाश्रमातच घालवत आहेत.

निवडणूक प्रणालीत पारदर्शकता आणण्याचं आणि निवडणूक प्रक्रिया बदलण्याचं सर्व श्रेय शेषन यांनाच जातं. तीन-चार टप्प्यात मतदान घेण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. मतदारांसाठी ओळखपत्र तयार करण्याची कल्पनाही त्यांनीच मांडली होती. शेषन हे १९९० मध्ये निवडणूक आयुक्त बनले होते. १९९० ते १९९६ पर्यंत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कारभार सांभाळला होता.

१९९६ मध्ये त्यांना मॅगसेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढली होती. पण माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्यांचा पराभव केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज