अ‍ॅपशहर

चीन सीमेवर अडकले शेकडो पर्यटक, लष्कराची बचाव मोहीम

नाताळ सुट्टीत पर्यटनासाठी सिक्कीममध्ये गेलेले शेकडो पर्यटक अडकले. जोरदार हिमवृष्टीमुळे रस्ता बंद झाल्याने ते अडकून पडले. पण भारतीय लष्कराच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2021, 8:05 am
सिलीगुडी : जोरदार हिमवृष्टीमुळे सिक्कीममधील चांगू तलावाजवळ शेकडो पर्यटक अडकले. त्यानंतर लष्कराने बचावकार्य सुरू केले आहे. अडकलेल्या पर्यटकांची संख्या १०२७ इतकी आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जोरदार हिमवृष्टीमुळे शनिवारी जवाहरलाल नेहरू रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे शेकडो पर्यटक चांगू तलावाजवळ अडकले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tourists who had been stuck in the upper reaches of east sikkim near the china border at nathu la were rescued by army
सिक्कीममध्ये चीन सीमेवर अडकले शेकडो पर्यटक, लष्कराची बचाव मोहीम


लष्कराने त्यांची सुटका केली आणि रात्री त्यांची जवानांच्या छावण्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केली. रविवारी सकाळी हवामानात किरकोळ सुधारणा झाली. पर्यटकांचे छोटे गट करण्यात आले आहेत. आणि सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या गंगटोकपर्यंत पायी जाण्यासाठी लष्कराचे जवान त्यांना मार्गदर्शन करत आहेत. शेवटचे वृत्त मिळेपर्यंत बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
sunny leone : सनी लिओनीला गृहमंत्र्यांचा इशारा; म्हणाले, 'जर का तीन दिवसांत... '

नाताळच्या सुट्ट्यांमुळे शेकडो पर्यटक चीनच्या सीमेजवळ असलेल्या सोंगमो किंवा चांगू तलावाला भेट देण्यासाठी आले होते. पण जोरदार हिमवृष्टीमुळे ते अडकले. आता हे बचावकार्य सोमवारपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, असे अधिकारी म्हणाले. अडकलेल्या पर्यटकांमध्ये २५० जण कोलकात्यासह पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांतील रहिवासी आहेत.

omicron india : आणखी एका राज्यात ओमिक्रॉनचा स्फोट!; पंचायत निवडणुका रद्द करण्याचा निर्णय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज